https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

घरोघरी तिरंगा’ या अभियानात सहभागी व्हा

0 33

उरण नगर परिषदेतर्फे नागरिकांना आवाहन

उरण दि 5 (विठ्ठल ममताबादे ) : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढायची स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक, स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना, यांचे संस्मरण व्हावे. तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुर्लिंग कायम तेवत रहावे. व देशभक्तीचे जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमाणसात राहावे या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे “घरोघरी तिरंगा ” हा उपक्रम राबवण्यातत येत आहे.

  1. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार “घरोघरी तिरंगा कार्यक्रम दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत उरण शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फुर्तीने करणे अपेक्षित आहे.
  2. प्रत्येक नागरिकांनी तिरंगा झेंडा संहितेचे पालन करावे..
  3. तिरंगा फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा.
  4. तिरंगा झेंडा उतरवताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरावा.
  5. घरोघरी तिरंगा उपक्रमात दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकविताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवण्याची आवश्यकता नाही. मात्र कार्यालयांना ध्वजसंहिता पाळावी लागेल.
  6. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकाने सन्मानाने व सुरक्षित ठेवावे.
  7. अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जाऊ नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा.
  8. अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला, झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जाऊ नये.

“घरोघरी तिरंगा ” या अभियानाकरिता उरण नगर परिषदेकडून झेंडे दिनांक 5 ऑगस्ट 2022 पासून उरण नगरपरिषद कार्यालय, पेन्शनर्स पार्क, गणपती चौक, मोरा साईबाबा मंदीर या ठिकाणी झेंडा वितरण विक्री केंद्रे स्थापन केले असून या ठिकाणी सर्व नागरिकांनी रक्कम रुपये 30/- मात्र भरून झेंडा खरेदी करावा. असे आवाहन उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.