Ultimate magazine theme for WordPress.

घारापुरी ग्रा. पं. च्या विविध विकास कामांच्या कार्यअहवाल पुस्तकाचे प्रकाशन

0 39

उरण दि 16(विठ्ठल ममताबादे ) : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सोमवार दिनांक 15/8/2022 रोजी सन 2017 ते 2022 या कालावधीत घारापुरी ग्रामपंचायतीने राबविलेले विविध उपक्रम व केलेल्या विकास कामांच्या कार्यअहवाल पुस्तिकेचे प्रकाशन घारापुरी येथील जेष्ठ नागरिक तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष व सदस्यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.तसेच यावेळी घारापुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बेटावर ठिक ठिकाणी तीन दिवस स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमही उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय,मराठी शाळा, अंगणवाडी,सरोवर (धरण) येथे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात होता.या छोटेखानी कार्यक्रमात सरपंच, उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी जेष्ठ नागरिक यशवंत म्हात्रे,नामदेव कोळी, भालचंद्र कोळी, सोमेश्वर भोईर,मुकेश भोईर,रमेश शेवेकर, लक्ष्मण भोईर, सरपंच बळीराम ठाकुर, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य मंगेश आवटे,भरत पाटील, सदस्या मीना भोईर,सुभद्रा शेवेकर, ज्योती कोळी, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर,बचत गट प्रमुख निशा म्हात्रे, अंगणवाडी सेविका,आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकंदरीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम राबवून घारापुरी ग्रामपंचायतने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.