बुडता बुडता दोघांना वाचवण्यात यश; बुडालेल्यांचा शोध सुरु
चिपळूण : चिपळूण नजीकच्या अलोरे येथील चार युवक तेथून जवळ असलेल्या कोळकेवाडी धरणात पोहण्यासाठी गेले असता कालव्यातून येणार्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले आहेत. पोहायला गेलेल्यांपैकी एकूण चारण बुडत असता तेथील स्थानिकांनी यातील दोघांना वाचवले तर दोघे अद्याप बेपत्ता आहेत. त्यामध्ये अलोरे येथ राहणारा सुजय संजय गावठे तसेव त्याची मैत्रीण ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर हिचाचा समावेश आहे.
या बाबतच्या अधिक माहितीनुसार बुधवारी 27 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दरम्यान बेपत्ता सुजय गावठे, ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर सोबत शाहीन कुट्टीनो, रुद्र जंगम तसेच कोळकेवाडी टप्पा 4 नजीक कालव्यात पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. हे चारजण पाण्यात अडकल्यावर आरडाओरड केली असताना लगत काम करणर्या धनगर बांधवांनी धाव घेतली रुद्र आणि शाहीन यांना बाहेर काढले. यावेळी सुजय बाहेर येत होता मात्र ऐशवर्या बुडत असल्याचे बघून पाण्यात परत गेला. त्या नंतर दोघे बेपत्ता झाले अलोरे पंचक्रोशीतील जि प सदस्य विनोद झगडे, तुषार चव्हाण, प्रमोद महाजन, घन:श्याम पालांडे, प्रकाश आंब्रे तसेच अनेक युवा कार्यकर्त्यांनी कोळकेवाडी धरण परिसराकडे धाव घेतली. त्या नंतर बचाव कार्य सुरुवात झाली आलोरे शिरगाव पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या नंतर पाहणी केली बेपत्ता असलेल्या दोघांना वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र अंधार पडताच बचावकार्य थांबवण्या आले.