चिपळूणमध्ये परशुराम घाटात वरच्या भागात भेगा
हलकी वाहतूक पर्यायी अंबडस लोटे मार्गे वळवली
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गांवर परशुराम घाटातील डोंगराला वरच्या बाजूला भेगा पडल्यामुळे या घाटातून होणारी हलकी वाहतूक कळंबस्ते-आंबडस-लोटे मार्गे वळविण्यात आली आहे.
या आधी मागील दोन दिवस घाटात दरडी कोसळून वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेले काही दिवस सुरु असलेला पाऊस लक्षात नाद्यांची वाढती पाणी पातळी पाहून एन डी आर एफ चे पथक चिपळूण मध्ये तैनात ठेवण्यात आले आहे.