https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

चिरनेर ते वहाळ श्री साईबाबांचा पायी पालखी दिंडी सोहळा उत्साहात

0 58

गुरुपौर्णिमेनिमित्त सोहळ्याचे आयोजन

उरण (विठ्ठल ममताबादे ) : बुधवारी 13 जुलै 2022 रोजी हिंदू धर्मातील प्रसिद्ध सणापैकी एक असलेले गुरुपौर्णिमा हा सण उरण तालुक्यात सर्वत्र मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला.

या गुरुपौर्णिमा सणाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याहि वर्षी ॐ साई सेवा मंडळ चिरनेर तर्फे श्री महागणपती मंदिर चिरनेर (उरण )ते श्री साई मंदिर वहाळ (पनवेल) दरम्यान श्री साईबाबाची पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या दिंडीत उरण मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री महागणपती मंदिर चिरनेर येथून वारकरी दिंडी पदयात्रा बुधवार दि 13/7/2022 रोजी दुपारी 12 वा. श्रीची आरती करून साई मंदिर वहाळ येथे प्रस्थान झाली.साई मंदिर वहाळ येथे साई मूर्तीचे दर्शन घेऊन पद यात्रेची सांगता झाली. एकंदरीत चिरनेर ते वहाळ पायी पालखी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यंदाचे हे पदयात्रेचे 7 वे वर्ष आहे.सदर पदयात्रा यशस्वी करण्यासाठी गजानन फुंडेकर (कार्याध्यक्ष),नितीन नारंगीकर ( उपाध्यक्ष), अमित मुंबईकर (अध्यक्ष),संतोष चिर्लेकर (सचिव),प्रसाद पाटील (खजिनदार),बबन ठाकूर (सल्लागार),गजानन म्हात्रे (सल्लागार),हरिश्चंद्र मोकल (सल्लागार),रमेश म्हात्रे (सल्लागार)यांच्यासह ॐ साई सेवा मंडळ चिरनेरचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.सर्व साईभक्तांनी दिंडी मध्ये सहभागी होउन श्री साईचा कृपाशिर्वाद घेतला.यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे भाविक भक्त, पदयात्री यांना भारतीय लष्कर मधील सैनिक प्रवीण बबन जाधव यांच्या हस्ते केळीचे वाटप करण्यात आले.यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, सदस्य हेमंत ठाकूर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.