Ultimate magazine theme for WordPress.

चिरनेर येथे १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव

0 52

उरण (विठ्ठल ममताबादे ):  छावा प्रतिष्ठान चिरनेर, युद्धनौका ग्रुप, ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १४ मे २०२२ रोजी उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एकमेव उरण तालुक्यात श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

गेली 2 वर्षे कोरोना असल्याने कोणतेही उत्सव सण, जयंत्या, पुण्यतिथी साजरे करता आले नाही. यंदा मात्र सर्व सण उत्साहात साजरे करण्यात येऊ लागले आहेत . श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती यावर्षी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी केली जाणार आहे. सकाळी 9 वा. श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे इंदुमती कृष्णा नागा कडू यांच्या हस्ते पूजन, सकाळी 10 वा. तृप्ती महेश गणेश केणी व रेखा संकेत काळू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सत्यनारायनाची महापूजा, दुपारी 3:30 वा. शिवबंधू प्रेमी, समस्त शिवभक्त, ग्रामस्थ मंडळ चिरनेर उरण, प. पु. हभप हसुराम बाबा केळवणे यांचे शिष्य हभप अनिल महाराज (वशेणी ), हभप गनपत महाराज(सावरसई ) व शिष्यगण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पालखी मिरवणूक सोहळा, सायंकाळी 7 ते 8 महाप्रसाद, रात्री 9 वा श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर युवा शिव व्याख्याते कु. विवेक परशुराम भोपी(नितळस )यांचे व्याख्यान असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

छावा प्रतिष्ठान चिरनेर, युद्धनौका ग्रुप,ग्रामस्थ मंडळ चिरनेर कातळपाडा, दुर्गा माता नवरात्र उत्सव चिरनेर, नवतरुण मित्र मंडळ कातळपाडा, अध्यात्मिक पौर्णिमा मंडळ चिरनेर भोम,अंकुश इलेव्हन, अर्जुन इलेव्हन, नरेंद्र महाराज सांप्रदाय चिरनेर, अभिनव मित्र मंडळ, निखिल स्पोर्ट्स, मंजित स्पोर्ट्स,छावा ग्रुप,सह्याद्री प्रतिष्ठान, आकृती कलामंच चिरनेर,ओम साई संवाद मंडळ चिरनेर, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आदी विविध सामाजिक संस्था श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणार आहेत.

सर्व शिवभक्तांनी पालखी सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी व दिवसभरातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.