उरण दि. 8 ( विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेचे अध्यक्ष तथा कट्टर शिवसैनिक,सामाजिक कार्यकर्ते जगजीवन भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
एम एस. ई.बी प्राथमिक शाळा बोकडविरा या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले तर रमाबाई आंबेडकर वसतीगृह विंधणे येथील आदिवासी गरजू विद्यार्थ्याना भेट वस्तू देण्यात आले. जगजीवन भोईर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, नातेवाईकांनी, मित्र परिवारांनी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम ते नेहमी राबवित असतात. वाढदिवसा निमित जगजीवन भोईर यांनी सामाजिक उपक्रम राबवून आपली समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली आहे.