Ultimate magazine theme for WordPress.

जनशक्ती संघटनेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

0 17

वर्धापन दिनानिमित्त अनेक महिला संघटनांचा सत्कार सोहळा

उरण (विठ्ठल ममताबादे ) : दि. 14 जुलै 2022 रोजी जनशक्ती संघटनेचा पहिला वर्धापन दिन साई मंदिर वहाळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उलवे येथील वहाळ या गावातील साई देवस्थान या ठिकाणी जनशक्ती संघटनेचा वर्धापन दिनानिमित्त अनेक महिला संघटनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांग मुलांना जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साई मंदिराचे संस्थापक तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ पाटील यांच्या हस्ते छत्री व वह्यांचे वाटप करण्यात आले.

या निमित्त दिव्यांग मुले व त्यांचे पालक यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.वर्धापन दिनानिमित्त रवीशेठ पाटील यांनी जनशक्ती संघटनेला शुभेच्छा दिल्या व ही संघटना गोरगरीब व जनतेच्या हिताची काम करणारी संघटना आहे असे उल्लेख केला. तर अध्यक्ष अतुल पाटील यांनी जनतेला संबोधित करताना सांगितले की जनतेची सेवा हिच ईश्वर सेवा असून कोणाला काही अडचण असेल तर आमच्या संघटनेचेच्या कार्यकर्त्यांना एक आवाज द्या. ते सदैव आपल्या सेवेत हजर असतील.कार्यक्रमाचे संचालन संतोष हाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन नवी मुबंई अध्यक्ष विनिता बर्फे यांनी केले.मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी रवीशेठ पाटील यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.