जय महाराष्ट्र!
भाजपचे प्रदेश चिटणीस नीलेश राणे यांचे बोलके ट्विट
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अतिशय बिकट झाल्यानंतर अखेरीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी केलेले ‘जय महाराष्ट्र’ हे ट्विट बोलके ठरले आहे.
ठाकरे सरकारच्या कारभारावर गेले अडीच वर्षे सातत्याने सरकारच्या कारभारावर प्रहार करणाऱ्या निलेश राणे यांनी अनेक उणीवा दाखवून दिल्या होत्या. या कालावधीत त्यांची ट्विट नेहमीच चर्चेत आली होती.
या पार्श्वभूमीवर गेले आठवडाभर राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या नंतर बहुमत सिद्ध करण्याऐवजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यावरसुद्धा निलेश राणे यांनी ‘जय महाराष्ट्र’ असे बोलके ट्विट केले आहे.