उरण (विठ्ठल ममताबादे ): जसखार गावात रत्नेश्वरी ग्रामसंघ जसखार यांच्या वतीने आशीर्वाद स्वयं सहायता समूह यांना सरकार मान्य रेशन धान्य दुकान परवाना मिळाला आहे. त्या दुकानाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विजय भोइर ,रेशन धान्य अधीक्षक बिराजदार, जसखार ग्रामपंचायतचे सरपंच दामोदर घरत व बचत गटाचे मदने सर हे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जसखार गावातील सर्व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.सीआरपी प्रीती ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
जसखार गावातील रेशन धान्य दुकानाचे दीपक ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |