Ultimate magazine theme for WordPress.

जागतिक वन महोत्सव बेलडोंगरीवर साजरा

0 38

उरण (विठ्ठल ममताबादे ) : ०१ ते ०७ जुलै ह्या जागतिक वन महोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशी वृक्षारोपण कार्यक्रम हा निसर्गमित्र स्व. आनंद हिराजी मढवी यांच्या स्मृतींना निसर्गरूपी आदरांजली देण्यासाठी बेलडोंगरीवर आनंदवन साकारण्यात येत आहे.

यासाठी विविध प्रजातींची देशी रोपांची लागवड करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वनविभाग परिमंडळ-१ चे अधिकारी संजय पाटील, उरण वनविभागाचे राजेंद्र पवार, एस. बी. इंगोले हे अधिकारी उपस्थित होते. बेलडोंगरीवरील आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक झाडांचे योग्य संगोपन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी, काशिनाथ खारपाटील, मनोहर फुंडेकर, मोहन फुंडेकर, नितीन मढवी, राजेश पाटील, विष्णू मोकळ, केशव ठाकूर, दिनेश चौलकर, विनीत मढवी, प्रणय परिंगे, बुधाजी पाटील, दिनकर कुंडेगाव, सुरेश म्हात्रे ,महेश मिरगे आदी सदस्यांनी खुप मेहनत घेतली असुन या परिसरात लागणारे वणवे रोखण्यासाठी ही संस्था वनविभागाच्या मदतीस नेहमी कार्यतत्पर असते. झाडे लावण्याबरोबर झाडे वाचवणे ह्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सहभागी संस्थाचे व उपस्थित वृक्षप्रेमींचे अभिनंदन यावेळी वनविभागातर्फे करण्यात आले.

सदर कार्यक्रमादरम्यान सर्पमित्रांनी पकडलेली दोन सापांना सुरक्षीत निसर्गाच्या सानिध्यात सोडुन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पाटील, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, धनंजय तांबे, वसंत वळकुंडे समिर म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.