Ultimate magazine theme for WordPress.

जागतिक सर्प दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्पमित्रांचा होणार सन्मान

0 33

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने 16 जुलै रोजी जागतिक सर्प दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील तमाम सर्पमित्रांचा आत्तापर्यंत करीत आलेल्या जीगरबाज निसर्गसेवेबद्दल आदर्श सर्पमित्र रायगड हा सन्मानपत्र देवून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. 

जागतिक सर्पदिन हा जगभरातील विविध सापांच्या प्रजातींविषयी जागरुकता वाढविण्यासाठी साजरा करण्यात येतो. साप हा जैवविविधेतील परिसंस्थेतील एक मुख्य घटक आहे, त्या सापांना वाचविण्याचे कार्य हे सर्पमित्र करित असतात. त्यासाठी ते आपल्या जीवाची कसलीही पर्वा न करता नागरी वस्तीत आलेले विषारी- बीनविषारी सापांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्याचे कार्य करीत असतात. आणि म्हणूनच वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी त्यांचे सन्मान करण्यासाठी समस्त रायगड जिल्ह्यातील सर्पमित्रांना आपल्या नावाची दिलेल्या व्हाटस्अप क्रमांकावर 9870955505 नोंदणी करण्याबाबतची एक जाहिरात सोशल मिडीयाद्वारे प्रसिद्ध केली आहे.9870955505 या व्हाट्सअप नंबर वर नोंदणी केलेल्या सर्पमित्रांना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांकावर आदर्श सर्पमित्र रायगड हे सन्मानपत्र पाठविण्यात येईल. रायगड जिल्हातील सर्पमित्रांचा सन्मान हा वटवृक्ष सामाजिक संस्थेमार्फत होणारा जिल्हास्तरिय पहिला उपक्रम असल्याने जास्तीत जास्त सर्पमित्रांनी नोंदणी करुन आपल्या कार्याचा गौरव करण्याची संधी द्यावी असे नम्र आवाहन संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.