उरण (विठ्ठल ममताबादे) : भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते तथा आमदार महेश बालदीचे कट्टर समर्थक, भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चांदायळी वाडी (केळ्याची माळ)व पुनाडे या शाळेतील विदयार्थ्याना दप्तर व खाउ वाटप करण्यात आले. चांदायळी वाडी (केळ्याचा माळ) जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत एकच शिक्षिका आहे. शिवाय शाळा उरण तालुक्यातील अति दुर्गम भागात आहे. त्यामुळे तेथील मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होउ नये म्हणून जितेंद्र पाटील यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त स्वतःच्या पैशातून एक शिक्षिका शाळेसाठी देण्याचा संकल्प केला. विजया दत्तात्रेय कातकरी या सुशिक्षित मुलीस मुलांना शिकविण्यास जितेंद्र पाटील यांनी सांगितले.विजया कातकरी हिचा मानधन जितेंद्र पाटील देणार आहेत . वाढदिवसा निमित जितेंद्र पाटील यांनी आदिवासी भागात खाऊ वाटप, दप्तर वाटप व स्वतःच्या पैशातून शिक्षिका नेमून सामाजिक बांधिलकी जपली आहे.यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मनीष पाटील यांचाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मनीष पाटील, पूर्व विभाग अध्यक्ष शशि पाटील,भाजपा पागोटे गाव अध्यक्ष – विजय पाटील , कुंडेगाव भाजपा गाव अध्यक्ष – अशोक मढवी, युवा मोर्चा सरचिटणीस पागोटे – साईराज भोईर,भाजपा युवा नेते निशांत पाटील, नंदन म्हात्रे, ग्रामपंचायत चिरनेर सदस्य- रमेश फोफेरकर,मछिंद्र मढवी, कामगार नेते निलेश पाटील,संदेश पाटील पुनाडे बूथ अध्यक्ष, सत्यवान कातकरी, वैभव पाटील, अक्षय पाटील आदी भाजपचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.