https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

जि. प. सदस्य विजय भोईर यांचे तब्बल ५५ वेळा रक्तदान

0 75

सामाजिक बांधिलकीचे उदाहरण

 उरण दि. ८ (विठ्ठल ममताबादे) : आपण अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर बघतो की ज्यांनी रक्तदान केले पण राजकीय क्षेत्रात राजकारण, समाजकारण करत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करणारे खूपच कमी व्यक्तिमत्व आहेत. त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक बांधिलकी तून नेहमी रक्तदान करणारे नवघर जिल्हा परिषद गटाचे सदस्य विजय भोईर.

राजे शिवाजी मित्र मंडळ कोटनाका येथे गणेशोत्सव निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी 55 वे रक्तदान केले. या अगोदर 54 ठिकाणी त्यांनी रक्तदान केले. उरण तालुक्यात कोणाला रक्ताची गरज असल्यास ते तातडीने पुरवितात. रक्ता मुळे कोणाचा जीव जाऊ नये.मृत्यूच्या दारात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला रक्त मिळालेच पाहिजे अशी भावना विजय भोईर यांची आहे. त्यामुळे विजय भोईर हे याच सामाजिक भावनेतून रक्तदान करीत असतात.विजय भोईर हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेतच शिवाय विजय विकास सामाजिक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष  आहेत.

या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्ष भर विविध सामाजिक उपक्रमही ते राबवित असतात. प्रत्येक कार्यात विजय भोईर व त्याचे भाउ विकास भोईर हे नेहमी अग्रेसर असतात. विजय भोईर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी, भाजपा उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, लायन्स क्लबचे उरणचे अध्यक्ष सदानंद गायकवाड व इतर मान्यवरांनी विजय भोईर यांच्या समाज कार्याचा, रक्तदानाचे कौतूक करत त्यांचा गौरव केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.