टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी 14 जुलै रोजी पेन्शन अदालत
रत्नागिरी : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांचेद्वारे 14 जुलै 2022 रोजी दुपारी 2.30 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांचे कार्यालय, पणजी येथे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पेंशन अदालत आयोजित केली आहे.
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी ज्यांचे तीन महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये कायदेशीर प्रकारणे (CAT/Court Cases), नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इत्यादी आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही.
निवृत्तीवेतनधारकांनी आपले अर्ज महेश एन, लेखा अधिकारी / सचिव, पेंशन अदालत, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांचे कार्यालय, पणजी यांचे नावे दिनांक 08 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवावेत. मुदती नंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही, असे डाकघर अधिक्षक, स्त्नागिरी विभाग, रत्नागिरी यांनी कळविले आहे.