तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट दापोली किनारी
तांत्रिक दोषामुळे बोट किनार्यावर आणल्याचे स्पष्ट
दापोली : तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट नौका बुधवारी (दि. 27 ) किनार्यावर आली होती. बोटीत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने काही वेळासाठी ती दापोली तालुक्यात पाळंदे समुद्रकिनारी आणण्यात आली. दरम्यान, बोट किनार्यावर लागल्याने मोठे कुतूहल निर्माण झाले होते. मात्र, बोट तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे पाळंदे समुद्र किनार्यावर आणण्यात आली होती. भारतीय तटरक्षक दलाची ही बोट आहे. दरम्यान या बाबत तटरक्षक दलाचे राजा चोलन यांनी सांगितले की, ही बोट मुंबईकडे निघाली असून बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ती किनार्यावर आणण्यात आली आहे. बोटीतील दोष दूर केल्यावर ती पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.27 आरपी 22 हॉवरक्राफ्ट