उरण (विठ्ठल ममताबादे ): 10वीं,12 वीचे आता निकाल लागलेले आहेत. या 10 वी,12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील नोकरी व्यवसायाच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सोमवार दि 27/6/2022 रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 1 या वेळेत उरण शहरातील तहसिल कार्यालय समोरील कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. एच के जगताप यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
10 वी,12 वी नंतर विद्यार्थ्यांना अनेक नोकऱ्या संधी आहेत फक्त त्या प्रत्येकाला ओळखता आले पाहिजेत.कोणताही व्यवसाय किंवा नोकरी हे लहान नसते. प्रत्येक नोकरी, व्यवसाय, धंदा श्रेष्ठ आहे. कोणत्याही नोकरीला, व्यवसायाला कमी समजू नका.असे सांगत जगताप यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवीला. विविध क्षेत्रे व त्या क्षेत्रातील नोकरीच्या संधी कशा प्राप्त कराव्यात याविषयी उत्तम मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य के ए शामा सर, जेष्ठ प्राध्यापक एस इंदुलकर, डॉ प्रा. दत्ता हिंगमिरे, डॉ. प्रा.पराग कारूळकर, प्रा. आर टी थावडे, प्रा. अरुण चव्हाण, डॉ. प्रा. एम जी लोणे, प्रा. ए के गायकवाड तसेच भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष विकी पाटील उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, सदस्य सुनिल वर्तक, गणेश म्हात्रे, सुमित कोळी, नमित कोळी, विवेक कोळी, हेमंत ठाकूर आदी संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक यांनी केले.यावेळी प्राचार्य बळीराम गायकवाड व सर्व प्राध्यापक, कर्मचारी वर्ग यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.एकंदरीत या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.