Ultimate magazine theme for WordPress.

दापोलीकर सायकलप्रेमींची पुणे पंढरपूर-पुणे सायकल वारी!

0 55

इंडो एथलेटिक सोसायटीतर्फे उपक्रम

दापोली : पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास. ह्या पंढरीच्या वारीची थोरवी महती सांगावी तितकी थोडीच, ती अनुभवावीच लागते. दरवर्षी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. या आषाढी वारीमध्ये खूप जनसमुदाय सहभागी होतो. १८ व १९ जून २०२२ रोजी दापोलीतील सायकलप्रेमींनी पुणे पंढरपूर पुणे असे तब्बल ४६० किमी अंतर सायकल चालवत सायकल वारी पूर्ण केली. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

इंडो एथलेटिक सोसायटीतर्फे पुणे पंढरपूर पुणे या मार्गावर सायकल वारी आयोजित करण्यात आली होती. या सायकल वारी मध्ये दापोली सायकलिंग क्लबतर्फे ६ जणांची टीम सहभागी झाली होती. यामध्ये साईप्रसाद उत्पल वराडकर (वय १२ वर्षे), स्वानंद जोशी यांनी पुणे ते पंढरपूर अशी सायकल वारी एका दिवसात पूर्ण केली. तसेच मृणाल मिलिंद खानविलकर, आकाश तांबे, भावेश मंडपे, अंबरीश गुरव यांनी पुणे- पंढरपूर- पुणे अशी सायकल वारी दोन दिवसात पूर्ण केली. भावेश मंडपे यांनी ही सायकल वारी सिंगल गिअर सायकलने केली.

याबद्दल अधिक माहिती देताना मृणाल खानविलकर यांनी सांगितले की, पंढरीच्या वारीमध्ये सहभागी व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. परंतु जास्त दिवस सुट्टी घेता येत नसल्यामुळे आम्ही पुणे पंढरपूर पुणे या ४६० किमीच्या वारी मार्गावर सायकल चालवत सायकल वारी केली. यामध्ये दोन दिवस आम्ही प्रत्येकी २३० किमी सायकल चालवली. यासाठी आम्ही काही दिवसापासून सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून आमचे स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा खूपच आनंददायी अनुभव होता. पंढरीची वारी सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे.

इंडो एथलेटिक सोसायटी तर्फे पुणे पंढरपूर पुणे या मार्गावर सायकल वारी आयोजित करण्यात आली होती. या सायकल वारी मध्ये दापोली सायकलिंग क्लबतर्फे ६ जणांची टीम सहभागी झाली होती. यामध्ये साईप्रसाद उत्पल वराडकर (वय १२ वर्षे), स्वानंद जोशी यांनी पुणे ते पंढरपूर अशी सायकल वारी एका दिवसात पूर्ण केली. तसेच मृणाल मिलिंद खानविलकर, आकाश तांबे, भावेश मंडपे, अंबरीश गुरव यांनी पुणे- पंढरपूर- पुणे अशी सायकल वारी दोन दिवसात पूर्ण केली. भावेश मंडपे यांनी ही सायकल वारी सिंगल गिअर सायकलने केली.

याबद्दल अधिक माहिती देताना मृणाल खानविलकर यांनी सांगितले की, पंढरीच्या वारीमध्ये सहभागी व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. परंतु जास्त दिवस सुट्टी घेता येत नसल्यामुळे आम्ही पुणे पंढरपूर पुणे या ४६० किमीच्या वारी मार्गावर सायकल चालवत सायकल वारी केली. यामध्ये दोन दिवस आम्ही प्रत्येकी २३० किमी सायकल चालवली. यासाठी आम्ही काही दिवसापासून सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून आमचे स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा खूपच आनंददायी अनुभव होता. पंढरीची वारी सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.