Ultimate magazine theme for WordPress.

दापोलीत जागतिक सायकल व पर्यावरण दिनानिमित्त उद्या सायकल फेरी आणि स्लो सायकल स्पर्धा

0 77

दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजन

दापोली : दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस आणि ५ जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मनुष्य आणि पर्यावरण यांचं अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. सायकल चालवणे केवळ पर्यावरणासाठीच चांगले नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सायकलचं महत्त्व व आरोग्यादायी फायदे समजून सांगण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार ५ जून २०२२ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सायकल फेरी झाल्यावर आझाद मैदान दापोली येथे स्लो सायकल स्पर्धा होणार आहे.

ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:०० वाजता सुरु होईल. ती डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक- कोकंबा आळी- श्री भैरीभवानी मंदीर गिम्हवणे- सोनार वाडी- तेली वाडी- एकता नगर- टांगर गल्ली- बुरोंडी नाका- आझाद मैदान अशी ६ किमीची असेल. सायकल फेरी झाल्यावर आझाद मैदानात ८:१५ वाजता स्लो सायकल स्पर्धा ३ गटात होतील. प्रत्येक गटातील ३ विजेत्यांना चषक, भेटवस्तू व प्रमाणपत्र हे बक्षीस म्हणून देण्यात येईल.

या सायकल फेरीसाठी आणि स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ९६७३७५०५५८ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सर्वांसाठी दर महिन्याला एक सायकल फेरी आयोजित केली जाते. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.