https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

दापोली उद्या ८ जून रोजी फेरफार लोक अदालत

0 41

तहसीलदार वैशाली पाटील यांचे नियोजन


दापोली : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेत येत आहे. महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक: मराअ-२०२१/प्र.क्र.३४ /म-५ दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ नुसार सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार फेरफार लोक आदालतीचे आयोजन बुधवारी ८ जून रोजी करण्यात आले आहे. मंडळ मुख्यालयात होणार आहे. तहसीलदार वैशाली पाटिल यांच्याकडुन या  लोकाभिमुख उपक्रमाच नियोजन करण्यात आले आहे.

सदर आदेशान्वये दापोली तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या एकूण १० महसूल मंडळांच्या ठिकाणी (दापोली, हर्णे, आंजर्ला, बुरोंडी, पालगड, वाकवली, देगांव, दाभोळ, आगरवायंगणी) प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या फेरफार अदालतीमध्ये एक महिन्यांच्या वर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणेत येणार आहेत.

तरी सर्वसामान्य जनतेने त्यांचे जमीनीबाबत काही अडचणी असल्यास त्याचे निराकरण करणेकरिता फेरफार अदालतीमध्ये अर्ज करावेत. प्रामुख्याने वारस तपासाचे काम, बोजा नोंदी घालणे व कमी करणे, तगाई बोजे कमी करणे, तसेच कर्ज प्रकरणी बँकेने अथवा वसुली अधिकारी यांनी कर्ज माफ केले असल्यास त्याबददलचे शेरे कमी करणे, सातबारामधील किरकोळ स्वरुपातील भोगवटादाराचे नांवातील तफावत दूर करणे/दुरुस्त करणे, हक्कसोड पत्र, बक्षिसपत्र यांसारखे नोंदणीकृत दस्तऐवजांची नोंद करणे वगैरे प्रकारची कामे केली जाणार आहेत. सदर अभियानामध्ये सुमारे १ महिन्यांच्या कालावधीमध्ये वरीलप्रकारची कामे अर्ज स्विकारुन त्यावर तात्काळ कार्यवाही करुन निर्गत करणेचे कामकाज केले जाणार आहे.

तरी या योजनेचा सर्वसामान्य जनतेने अधिकाधिक लाभ घ्यावा व शासनाच्या या उपक्रमास सहकार्य असे आवाहन दापोली तालुका तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.