‘
उरण (विठ्ठल ममताबादे ) : दिनांक 7 आँगस्ट 2022 रोजी एकविरा कला संस्था आणि गायक दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या मार्फत ‘दिबा साहेबांना सांस्कृतिक आदरांजली’ हा कार्यक्रम नवी मुंबई मधील कामोठे येथील आगरी समाज मंगल कार्यालय हाँल येथे मोठ्या थाटामाटात आणि विविध मान्यवरांच्या ,कलाकरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, धर्मराज पक्षाचे अध्यक्ष राजन राजे ,भुमीपूत्रांचे नेते जे.डी.तांडेल ,पनवेल च्या माजी उपमहापौर चारुशीला घरत ,माजी उपमहापौर भाई जगदीश गायकवाड, स्थानिक नगरसेवक ,नगरसेविका, मिनिडोर रिक्षा चालक मालक रायगड जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ पाटील,कामगार नेत्या श्रुती म्हात्रे,दिशा महीला मंच अध्यक्षा निलम आंधळे,स्रीशक्ति फाउंडेशन अध्यक्षा विजया कदम,मेकअप आर्टीस्ट स्नेहा पाटील, मेकअप आर्टीस्ट शितल काळे,पहिला मराठी इंडीयन आयडल सागर म्हात्रे, एकापेक्षा एक फेम पपन पाटील,कोरिओग्राफर स्व.नितीन पाटील यांच्या पत्नी,युट्यूब फेम जयेश पाटील ,संगीत विशारद किर्ती गोंधळी आणि आगरीकोळी कलाकार उपस्थित होते.
या कार्यक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आंदोलन तनमनधनाने काम करणाऱ्या काही व्यक्तींना दिबांचा योद्धा हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.सागर म्हात्रेचा नागरीसत्कार करण्यात आला.स्व.नितीन पाटील यांना भुमीपूत्र गौरव त्यांच्या मुलाला व पत्नीला आमंत्रित करून प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना ‘दिबांचा योद्धा’ या विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.नितीन पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी साठी गौरविण्यात आले,विविध सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उरण मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था या संस्थेला दिबांचा योद्धा विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी अभंग गायन स्पर्धा आयोजित करण्यात आले व 60 आगरी कोळी कराडी कलाकारांना कला सन्मान 2022 ने गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमाची प्रस्तावना तेजस पाटील यांनी सादर केली. व प्रस्तावना सादर करताना त्यांनी तीन मागण्या केल्या. पहिली मागणी कलाकारांना कला सादर करण्यासाठी मोफत रंगमंच मिळण्याची, दुसरी मागणी विमानतळ सुरु होण्याआधी त्याठिकाणी निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांसंर्दभात तंत्र शिक्षण येथील तरुणांना मिळावे यासाठी काँलेजची निर्मिती व्हावी.तसेच रायगड जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ची शाखा करण्यात यावी. या मागण्या केल्या.सदर कार्यक्रमा मध्ये अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.या ठिकाणी अभंग स्पर्धेचे संयोजन तबलावादक मिलिंद कडू आणि पखवाज वादक अविनाश पाटील यांनी केले.तर संगीत विशारद किर्ती गोंधळी यांनी परिक्षक म्हणून काम केले. निवेदन कोमल डांगे यांनी केले.सदर स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र कलाकारांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचा शेवट हा आगरीकोळी गायकांनी गाणी गाऊन आनंदाने नाचून केला.