देव- घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयात ‘जिओ फोटोग्राफी’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव- घैसास – कीर वरिष्ठ महाविद्यालयात दि. ५ जुलै २०२२ रोजी महाविद्यालयातील शिक्षकांसाठी ‘जिओ फोटोग्राफी’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वैभव उदय कीर उपस्थित होते.
श्री कीर यांनी जिओ मॅप कॅमेरा ॲप्लीकेशनची माहिती देताना ॲपचे फायदे,महत्व व वैशिष्ट्ये सांगून त्या ॲप वापरुन फोटो कसे काढायचे याबद्दल शिक्षकांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेत महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव, सर्व प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते.A :