https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

0 78

द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात लढत

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपतिपदासाठी आज (दि. १८ जुलै ) मतदान होत असून, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यादरम्यान लढत होणार आहे.
या लढतीत मुर्मू यांचे पारडे जड आहे. विरोधी गोटातील अनेक राजकीय पक्षांनी मुर्मू यांना पाठिंबा दिलेला असल्याने त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.
राष्ट्रपती निवडणुकीत संसदेच्या उभय सदनांचे निवडून आलेले खासदार तसेच सर्व राज्यांतील विधानसभांचे निवडून आलेले आमदार मतदान करतात. खासदार आणि आमदारांची एकूण संख्या 4 हजार 800 इतकी आहे. तर या मतदारांची मतसंख्या 10 लाख 86हजार 431 आहे, त्यातील साडेसहा लाखांवर मते मुर्मू यांना पडतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. निकाल 21 तारखेला जाहीर केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.