https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

धामणी यादववाडीतील युवकाचा ३०० वेळा रक्तदान करण्याचा संकल्प !

0 53

आतापर्यंत ९५ वेळा केलेय रक्तदान

संगमेश्वर (सचिन यादव) : माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दानधर्म कोणता असेल तर तो रक्तदान. आवश्यकता असलेल्या व्यक्तीला रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. हीच कास धरून संगमेश्वर तालुक्यातील धामणी यादववाडी येथील युवक गजानन रमेश नार्वेकर याने हेरून रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. १६ वर्षात त्याने तब्बल ९५ वेळा रक्तदान केले आहे. ३०० वेळा रक्तदान करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

रक्तदानाचे महत्व ओळखून वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी संगमेश्वर तालुक्यातील धामणी यादववाडी येथील युवक गजानन रमेश नार्वेकर या तरुणाने रक्तदान करण्याचा संकल्प केला.
एवढ्या लहान वयात हे करणं थोडं कठीण असलं तरी ते करणं किती योग्य आहे हे या तरुणांने सिध्द करून दाखविले आहे.
आतापर्यंत त्यानं ९५ वेळा रक्तदान केले आहे आणि आता तो ३७ वयाचा आहे आपण वयाच्या ६५ व्या वर्षी हा संकल्प ३०० पूर्ण करुन थांबणार आहे असा निश्चय पक्का आहे असं गजानन नार्वेकर सांगतात.
गजानन नार्वेकर हे मुंबई मध्ये वास्तव्यास आहेत.तब्येतीने जर का मला चांगली साथ दिली तर मी ४०० वेळा रक्तदान करणार हा माझा अनुभव सांगत आहे. नार्वेकर हे प्लेटलेट्स दान दर महिन्यातून एकदा करतात.
प्लेटलेट्स दान करताना एकदा सुई टोचल्यावर साधारण दीड तास डोनेशनसाठी लागतात.
प्लेटलेट्स दान करतो म्हणजे दर महिन्याला सेवा करता यावी यासाठी.

प्लेटलेट्स दान वर्षातून २४ वेळा करता येते पण मी वर्षातून १० ते १२ वेळा अवश्य करतो.
रक्तदानावर कामं करणाऱ्या भारतातल्या सर्व संस्थाचा मी सभासद आहे याचा देखील मला आनंद आहे.
आपले मुख्य कार्य आहे ते म्हणजे जनजागृती या माध्यमातून आपण सगळ्यांना रक्तदान का करावे रक्तदान केल्यास काय होत हे समजून सांगण्याचा प्रयत्न करन गरजेचे आहे.
थॅलेसमिया हिमोफेलिया आणि सिकल सेल रुग्णांना वेळेवर मोफत रक्त मिळावे आणि मुख्य म्हणजे थॅलेसमिया हिमोफेलिया आणि सिकल सेल हे रुग्ण यापुढे जन्माला येऊ नये ह्यासाठी प्रत्येक व्यक्तीची किंवा प्रत्येक गरोदर मातेची HPLC टेस्ट व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे आणि समाजात ह्याबद्दल जनजागृती करणं गरजेचं आहे.
तुमचे रक्त दुसऱ्याचे जीवन आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे
आपण मंदिरात जाऊन करतो ईश्वर सेवा आणि रक्तदान करुन करु समाजसेवा करतो, असे गजानन नार्वेकर सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.