धामणी येथे १४ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर
कामगार कल्याण मंडळ व संगमेश्वर भाजपा सरचिटणीस डॉ. ताठरे यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
संगमेश्वर : तालुक्यातील कामगार कल्याण मंडळाच्यावतीने आणि भाजपचे संगमेश्वर तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे यांच्या सहकार्यातून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:०० ते दु. ०१:०० वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय धामणी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या आयोजनातून साजरा होत आहे. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी ज्या उद्देशाने अमृत महोत्सव अभियानाचा शुभारंभ केला; आज अंतिम टप्प्यात वाढता लोकसहभाग पाहून अभियानाचा तो उद्देश सफल होत आहे असे म्हटल्यास गैर ठरणार नाही.
या शिबिराचा जास्तीत जास्त कामगारांसह कुटुंबियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाॅ. अमित ताठरे यांनी केले आहे.