धामणी शाळेतील विद्यार्थी अखेर हक्काच्या वर्गखोलीत
संगमेश्वर : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा धामणी नंबर १ आपल्या स्वतःच्या इमारतीत भरवली जावू लागल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गानी समाधान व्यक्त होत आहे.
धामणी येथील या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकुण ३२ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत
पूर्वी येथे कौलारू छपराची जुनी इमारत होती. मात्र नवीन इमारतीसाठी २०१९ मध्ये जुनी इमारत पाडण्यात आली होती. त्यानंतर शाळा ग्रामपंचायतीच्या सभागृहात भरली जात होती.. मात्र याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.
यामुळे परिसरातील साफसफाई व इतर कामं करून शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या वर्गात शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे
शालेय व्यवस्थापन समितीने नवागत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.