नामफलकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अनावरण
उरण (विठ्ठल ममताबादे ) : 1984 च्या शेतकरी आंदोलनातील 5 हुतात्म्यांना अभिवादन करून तसेच लोकनेते माजी खासदार दि.बा.पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून धुतूम गावचे हुतात्मे रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचे बलिदान कायम स्वरुपी स्मरणात रहावे. या प्रेरणेने धुतूम ग्रामपंचायत यांनी सर्वानुमते ग्रामसभेत ठराव संमत करून धुतूम गावाच्या मैदानाला हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर खेळाचे मैदान असे नामकरण करण्यात आले. सदरचे मैदान TIPL कंपनी च्या माध्यमातून धुतूम येथे बनविण्यात आले आहे. दिनांक 27/6/2022 रोजी या नामफलक चे अनावरण लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ मनीष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, सरपंच रेश्मा शरद ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर, ग्रा.प.सदस्य सदानंद ठाकूर, अंगत ठाकूर, रविनाथ ठाकूर, सदस्या वैशाली पाटील,आशा ठाकूर,पूजा ठाकूर, माजी सरपंच शंकर ठाकूर, प्रकाश भाऊ ठाकूर, हुतात्मे पुत्र लक्ष्मण रघुनाथ ठाकूर व परिवार, माजी सरपंच रामनाथ ठाकूर, दिपक मढवी गावठाण, मुरली ठाकूर रांजनपाडा, विनोद पाटील गावठाण, संजय ठाकूर जासई, बळीराम बाळू ठाकूर, संजय मोहन ठाकूर, कुंदन पाटील, प्रभाकर हरिश्चंद्र ठाकूर, रामचंद्र ठाकूर, महेन्द्र ठाकूर, अभय ठाकूर, संदीप ठाकूर, अरुण ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, मेघनाथ ठाकूर, अमित ठाकूर, राजेश ठाकूर, नंदू ठाकूर, निलेश ठाकूर, संदेश ठाकूर, तुकाराम ठाकूर, नंदेश दशरथ ठाकूर तसेच इतर सन्माननीय ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. या वेळी सरपंच यांनी सर्वांचे स्वागत केले तर प्रास्तविक व आभार रायगड भूषण डि.आर. ठाकूर यांनी मानले. ग्रामपंचायतच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल यावेळी सर्वांचे आभार मानण्यात आले.