Ultimate magazine theme for WordPress.

नवघर उपसरपंचपदी परेश जगदीश पाटील यांची बिनविरोध निवड

0 42

उरण दि 23(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतचे माजी सदस्य कै. जगदीश हसुराम पाटील यांचे हृदयविकाराने अकस्मात दुर्दैवी मृत्यू झाला. ते नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी विराजमान होणार होते मात्र काळाने अगोदरच त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली.त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे सुपुत्र परेश जगदीश पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आणून परेश पाटील यांना नवघर ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून बिनविरोध निवडून देण्यात आले. कै. जगदीश हसुराम पाटील यांच्या मुलाला उपसरपंच बनवून कै. जगदीश हसुराम पाटील यांचे राहिलेले इच्छा पूर्ण करण्यात आली. एक प्रकारे परेश पाटील यांना उपसरपंच बनवून नवघर ग्रामपंचायतने कै जगदीश पाटील यांना श्रद्धांजलीच वाहिली आहे. यात सर्वात महत्वाची भूमिका निभावली ती जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी.

नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी परेश जगदीश पाटील यांची नियुक्ती करण्यात येईल असा शब्द जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिला होता.त्याची पूर्तता विजय भोईर यांनी परेश पाटील यांना उपसरपंच बनवून केली. विजय भोईर यांनी दिलेला शब्द पाळल्याने नवनिर्वाचित उपसरपंच परेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उद्योजक विकास भोईर व नवघर ग्रामपंचायतचे आभार मानले आहेत.दिनांक 23 /6/2022 रोजी परेश पाटील हे उपसरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उद्योजक विकास भोईर,सरपंच आरती चौगुले, माजी उपसरपंच गणेश वाजेकर,माजी सभापती महादेव बंडा, ग्रामविकास अधिकारी किरण केणी, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर,नवघर ग्रामपंचायत सदस्य हितेश भोईर, सुरेश बंडा, दमयंती पाटील, सुमती बंडा, प्रीती तांडेल, भूपेंद्र कडू,चैताली पाटील, समाधान भोईर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.