रत्नागिरी : नागपूर ते मडगाव अशी रेल्वे बोर्डाची परीक्षा देणाºया उमेदवारांच्या सोयीसाठी एक्झामिनेशन स्पेशल ट्रेन दि. १२ जून रोजी कोकण रेल्वे मार्गांवरील मडगांवपर्यंत धावणार आहे.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत एनटीपीसी सीटीबीटीच्या लेव्हल 2, 3 आणि ५ साठी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दि. 12 जून रोजी नागपूर ते मडगाव अशी ‘एक्झामिनेशन स्पेशल’ रेल्वे गाडी (01063/01064) चालवली जाणार आहे.
ही गाडी नागपूर येथून दि. १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि मडगाव ला ती दि. 14 जून रोजी रात्री एक वाजता पोचेल.
परतीच्या प्रवासात मडगाव येथून ही गाडी दिनांक १५ जून रोजी दुपारी तीन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ती नागपूरला रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल.
ही गाडी धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव बेलापूर, अहमदनगर, दौंड पुणे जंक्शन, सातारा, मिरज, लोंढामार्गे कोकण रेल्वे मार्गावरील मडगांवपर्यंत धावणार आहे.
एकूण 16 डब्यांच्या या गाडीला थ्री टायरचे 2, सेकंड सीटिंगचे बारा एस एल आर 2 असे डबे जोडले जाणार आहेत.
