Ultimate magazine theme for WordPress.

नाणार रद्द झाल्याने बारसू-सोलगावमध्ये रिफायनरी उभारणीच्या हालचालींना वेग

0 49

प्रकल्पाकरीता लागणारी वीज, पाणी यांच्या उपलब्धतेकरिता वरिष्ठ पातळीवर हालचाली


राजापूर : तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने केंद्र शासनाला जागा उपलब्धततेसंबंधित दिलेले पत्र आणि त्यानंतर केंद्रीय पथकाने जागेची केलेली पाहणी केल्याची माहिती समोर आलेली असताना आता या प्रकल्पाकरीता लागणारी वीज, पाणी यांच्या उपलब्धतेकरिता वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बारसू, सोलगाव परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे.
नाणार परिसरात झालेल्या विरोधानंतर रद्द झालेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू सोलगाव परिसरातील 13 हजार एकर जागा देण्याची तयारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दर्शविल्यानंतर रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या पत्रानंतर आरआरपीसीएल, एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड यांच्या जोडीला राज्यातील एमआयडीसीच्या सर्व वरीष्ठ अधिकार्यांनी धोपेश्वर-बारसूमधील संभाव्य जागेची पाहणी केल्याची माहिती पुढे आली आहे. या पाहणीनंतर आता प्रकल्पस्थळासाठी पाणी, वीज यांच्या उपलब्धतेबाबतकरीता वरीष्ठ पातळीवर आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
ज्याठिकाणी आता रिफायनरी प्रकल्प उभा राहू शकतो त्याठिकाणच्या सुमारे 2300 एकर जमीनीची यापूर्वीच एमआयडीसीसाठी अधिसूचना राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाने जारी केलेली आहे. दोन महिन्यांपूर्वी रिफायनरी प्रकल्पाबाबत ऑईल कंपन्यांचे संचालक, एमआयडीसीचे अधिकारी यांनी बारसूच्या जागेला अनुकूलता दर्शवल्याने आता त्या पाहणीचे अहवाल तयार करण्यासाठी निविदा प्रकिया राबवून एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही एजन्सी म्हणजे केंद्रीय पथक असून ते नजीकच्या काळात प्रत्यक्ष जागेवर येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रिफायनरी प्रकल्प समर्थक समर्थन समितीच्या पदाधिकार्यांना दिली होती. त्यानंतर आता प्रकल्पासाठी लागणारी वीज आणि पाण्यासह अन्य सुविधांच्या उभारणीच्या अनुषंगाने वरीष्ठ स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये धोपेश्वरमध्ये प्रकल्प उभा राहत असतानाच प्रकल्पासाठी आवश्यक बंदर म्हणून नाटेची निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या दृष्टीने राजापूरपासून नाटेपर्यंत चौपदरी रस्ता विचाराधीन असून त्याचीही पाहणी सुरू झालेली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.