Ultimate magazine theme for WordPress.

नामांकित कृषितज्ञ गोपाळ वर्तक यांचे निधन

0 34

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण,पनवेल तालुक्यातील नामांकित कृषितज्ञ गोपाळ आलोजी वर्तक (84)यांचे गुरुवार दि. 14 जुलै 2022 रोजी सकाळी 6 वाजता गोवठणे येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण उरण पूर्व विभागावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबातील कर्ता हरपल्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.उरण व पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषि क्षेत्राला संजीवनी देणारे गोपाळ वर्तक यांनी ग्रामीण विभागात अनेक ठिकाणी आंबा,काजू, चिकू,बोरे,फणस यासारख्या फळबागा फुलवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
या शिवाय स्वतः कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असतांना अहोरात्र मेहेनत घेऊन अनेक शेतकऱ्यांचे व्यवसाय वृध्दिंगत करण्याचे काम केले आहे.तर उरण तालुक्यातील त्यांचे राहते घर असलेल्या गोवठणे गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी 4 वर्षे शासनाकडे पाठपुरावा केला.वयाच्या 79 व्या वर्षी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून येऊन उपसरपंच पदावरही काम केले.या कालखंडात गोवठणे गावात विविध प्रकारची विकास कामे केली.तर सामाजिक कार्यातही कार्यरत राहून अनेक गरीब,गरजूंना मदतीचा हात दिला आहे
जनमानसात स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणारे गोपाळ वर्तक यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंतयात्रेसाठी मुसळधार पाऊस कोसळत असतांनाही तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि चितचिंकांनी मोठी गर्दी केली होती.

त्यांच्या मागे त्यांची पत्नी,दोन मुली,दोन मुलगे, सुना,जावई,नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार असून,त्यांचा दशक्रिया विधी दि.23 जुलै श्री क्षेत्र माणकेश्वर येथे तर उत्तरकार्य राहत्या घरी गोवठणे येथे 26 जुलै 2022 रोजी करण्यात येणार असून सांत्वनासाठी येणाऱ्या नातेवाईक मित्रमंडळीने कोणत्याही प्रकारचा दुखवटा आणू नये असे आवाहन त्यांचे चिरंजीव सुनिल वर्तक व राजेश वर्तक यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.