‘निसर्गरम्य चिपळूण’तर्फे टंचाईग्रस्त अंत्रवलीत पाणी पुरवठा
संगमेश्वर : निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर तालुक्यातील येथील अंत्रवली मालपवाडी आणि बौध्दवाडी येथील ग्रामस्थाना पाणी वाटप करण्यात आले.
या भागातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला समोरे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप तर्फे त्यांना पाणी वाटप केले. मोफत पुरवल्या नंतर ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.