Ultimate magazine theme for WordPress.

नील पराडकर यांचे निधन

0 26

संगमेश्वर : तालुक्यातील आंबेड खुर्दचे रहिवासी आणि धामणी येथे वास्तव्याला असणारे नील मनोहर पराडकर ( ४७ ) यांचे शुक्रवारी रात्री ११ : ३० वा . मेंदूविकाराने निधन झाले . त्यांच्या अकाली निधनाने धामणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

नील मनोहर पराडकर यांनी अनेक वर्षे धामणी येथे वडिलांच्या मदतीने हॉटेल आणि आंबा व्यवसाय केला . धामणी येथील गणेश मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले . हसतमुख , मनमिळाऊ आणि अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून नील यांची धामणी परिसरात ओळख होती . गतवर्षी त्यांना ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले . पुणे येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली . मात्र या आजारातून ते बरे झाले नाहीत. अखेर शुक्रवारी रात्री ११ : ३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली . नील यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा आणि वडील लेखक मनोहर पराडकर असा परिवार आहे. आज दुपारी धामणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी धामणी परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते .

नील पराडकर
Leave A Reply

Your email address will not be published.