https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

नेमबाज अंजली भागवतला गुहागरची ओढ

0 87

कुटुंबासह भेट देवून घेतला पर्यटनाचा आनंद!
गुहागर : गुहागरला लाभलेल्या नीळाशार समुद्राच्या पर्यटनाची भुरळ सर्वानाच पडते. भारताची प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत हिलाही गुहागरच्या पर्यटनाची ओढ स्वस्त बसू देत नसल्याने तिने आपल्या कुटुंबासह नुकतीच गुहागर तालुक्यातील पर्यटनस्थळांना भेट देऊन येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद
घेतला.
गुहागर तालुका हा पर्यटनात देशाच्या नकाशावर झळकलेला आहे. अभिनेत्री, अभिनेते यांना येथील पर्यटनाची ओढ आहे. आता खेळाडूना देखील येथील निसर्गसौंदर्य भुरळ घालू लागले आहे. तालुक्यातील परचुरी येथील सत्यवान देरदेकर यांच्या आजोळ कृषी पर्यटन केंद्रात येऊन भारतीय नेमबाज अंजली भागवात यांनी येथील पर्यटनाचा आनंद घेतला. अंजली भागवत या एक व्यावसायिक भारतीय नेमबाज आहे. त्यांना नेमबाजीच्या क्षेत्रामधे मानाचा समजला जाणारा आयएसएसफ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार 2002 साली म्युन्शेन येथे मिळाला. 2003 मध्ये मिलान येथे त्यांनी पहिला विश्वचषक जिंकला. सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सन 2000 मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या नेमबाजपटू सध्या गुहागर तालुक्यात पर्यटनासाठी आल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.