रत्नागिरीत आज दिवसभर मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे भंडारपुळे रस्त्यावर दरड कोसळली. खेड तालुक्यातील मौजे खोपी जांभळेवाडी येथील सात कुटूंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.आज दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
नेवरे भंडारपुळे रस्त्यावर दरड कोसळली. मात्र वाहतूक सुरळीत सुरु होती. खेड तालुक्यातील मौजे खोपी जांभळेवाडी येथील 7 कुटूंबातील 24 जणांचे दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे स्थलांतरण करण्यात आले. 7 कुटूंबातील 24 जणांचे जुने राहते घर आणि जि. प. शाळेत स्थलांतर करण्यात आले. जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 545 मिमी आणि सरासरी 60.56 मिमी पावसाची नोंद झाली आहे
