Ultimate magazine theme for WordPress.

नेव्हल डॉकयार्ड को ऑपेरेटीव्ह बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे पॅनल विजयी

0 49

उरण (विठ्ठल ममताबादे ): पगारदार कामगारांची असलेली नेव्हल डॉकयार्ड  को ऑपेरेटीव्ह बँक. या बँकेच्या मुंबई मधील सर्वात मोठी बँक म्हणजे नेव्हल डॉकयार्ड  को ऑपेरेटीव्ह बँक या बँकेच्या 2022-27 या पंचवार्षिक निवडणुकीत  गेली 27 वर्षे बँकेवर  संचालक /मानद सचिव पदाचा  अनुभव असणारे नेव्हल एम्प्लॉयीस युनियनचे  अध्यक्ष कॉम. पिताबस पानीग्रही यांच्या नेतृत्वाखाली NEU, BPMS व NCKS यांच्या महायुती पॅनलने  INEU व ANTISA यांच्या पॅनल चा  धुव्वा उडवीला आहे. 21 पैकी 19 जागांवर  विजय मिळवून निर्विवाद सत्ता मिळविली आहे व बँकेवर आपले  पुन्हा वर्चस्व ठेवले आहे. विरोधी पॅनल ला फक्त दोनच जागेवर  समाधान मानावे लागले. या विजयासाठी  महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष  परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.