Ultimate magazine theme for WordPress.

परशुराम घाटात 30 जुलैपर्यंत एकेरी वाहतूक

0 30


जिल्ह्यात दोन ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात

चिपळूण : कोकण विभागात – रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी संपलेल्या 24 तासात 20.1 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा दि. 30 जुलै 2022 पर्यंत सकाळी 06 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.

सायंकाळी 07.00 वा. ते सकाळी 06 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याने आधी दुपारर्पंत एकेरी वाहतूक सुरु होती. दुपारी दरड हटवल्यावर मात्र, तेथील वाहतूक पूर्वदावर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाची स्थिती लक्षात घेत यावर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन छऊठऋ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.