Ultimate magazine theme for WordPress.

पाच कोटी लीटर जलसंचय करणारा बंधारा !

0 30

चिपळुणातील दिशान्तर संस्थेकडून चिपळुणातील खांदाट येथे उभारणी
चिपळूण : येथील दिशान्तर सामाजिक संस्थेच्यावतीने तालुक्यातील खांदाट येथील वैतरणा नदीवर सिमेंट काँक्रिट बंधार्‍याची निर्मिती केली आहे. यातून 5 कोटी लीटरहून अधिकचे जलव्यवस्थापन करण्यात आले असून, या बंधार्‍याचे लोकार्पण नुकतेच दिशान्तरचे अध्यक्ष राजेश जोष्टे यांच्याहस्ते करण्यात आले.
कोकण वगळून उर्वरित महाराष्ट्रासह इतर राज्यांना पाणी देण्यापूर्वी कोकणी जनतेला तहानलेलं ठेवून इथलं पाणी इतर ठिकाणी वळवता येणार नाही, असे प्रतिपादन दिशान्तर अध्यक्ष राजेश जोष्टे यांनी केले. जलसमृद्धी ही आर्थिक समृदधी आणते. यामुळे कृतीशील व्हा. ग्रामविकासात पुढाकार घ्या, असे संस्था सचिव सीमा यादव यांनी सूचित केले. दिशान्तर संस्थेने यापूर्वी देवखेरकी, ओवळी, कामथे, मांडवखरी, वेहेळे येथे जीवनावश्यक पाणी व शेती प्रकल्पांसाठी यशस्वी जलव्यवस्थापन केले आहे. ज्यामध्ये बोअरवेल, विहीर, पाणी टाक्या, नदीवर आरसीसी बंंधारे उभारणी दिशान्तरतर्फे करण्यात आली आहे. तालुक्यातील खांदाटपाली गुु्र्र्रप ग्रामपंचायत क्षेत्रातून वाहणार्‍या वैतरणा नदीवर गावासाठी पाणी उपसा केंद्र भागात 110 फूट लांबीचा व जमिनीखालून 8 फूट उंचीचा असा हा सिमेंट काँक्रीट बंधारा बांधण्यात आला आहे. विशेष म्हणजे जमिनीखाली यासाठी मोठे खोदकाम करून स्टील बांधणीने हा बंधारा भक्कम करण्यात आला आहे.
कार्यक्रमास संस्थेचे नितीन यादव, राधाकृष्ण मंदिर समितीचे सीताराम खेडेकर, संजय खेडेकर, राजेंद्र तटकरे, रवींद्र खेडेकर आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. सूत्रसंचालन राहुल तटकरी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.