पुष्पा परशुराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्नाळा आपटा येथे रिक्षा स्टँण्डची स्थापना
उरण दि. 1 (विठ्ठल ममताबादे) : गेली एक वर्ष झाले कर्नाळा आपटा येथील रिक्षा चालकांना अधिकृत रिक्षा स्टॅन्ड उपलब्ध होत नव्हते.कर्नाळा आपटा येथे अधिकृत रिक्षा स्टॅन्ड व्हावे यासाठी रिक्षा चालकांनी भरपूर प्रयत्न केले मात्र रिक्षा स्टँण्ड झाले नाही. ही बाब मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पुष्पा परशुराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतूल भगत यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेचच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आर टी ओ ऑफिस कळंबोली येथील अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. लगेचच आरटी ऑफिसच्या अधिका-यांनी आपटा (कर्नाळा) येथील रिक्षा स्टॅन्डला परवानगी दिली. अतूल भगत यांनी या गोष्टीचा सतत पाठपुरावा केल्याने आपटा कर्नाळा येथे रिक्षा चालकांना अधिकृत रिक्षा स्टँण्ड मिळाले. रिक्षा स्टॅण्ड मिळाल्याने रिक्षा चालकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. सर्व रिक्षा चालकांनी या सर्व गोष्टीचे श्रेय अतूल भगत यांना देत त्यांचे आभार मानले.यावेळी कर्नाळा ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, उपसरपंच राजू पाटील, सरपंच साबीर दाखवे, सदस्य बाळू शेठ पाटील, दिनेश पाटील, विनोद पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.