Ultimate magazine theme for WordPress.

पैसा फंडचा इंटरमीजिएट रेखाकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

0 48

प्रशालेचे आठ विद्यार्थी ‘अ ‘ श्रेणीत 
संगमेश्वर : व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल , संगमेश्वरचा शासकीय रेखाकला परीक्षा २०२२ इंटरमीजिएट परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे . कलासंचालनालयाच्या वेबसाईटवर आज दुपारी ३ वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रथमच असा निकाल जाहिर झाला . विशेष म्हणजे वेबसाईटवरुन परीक्षेचे प्रमाणपत्र देखील लगेचच डाऊनलोड करता आले . या सर्वाचा मार्च २०२२ ला दहावी परीक्षेला प्रविष्ट  झालेल्या विद्यार्थ्यांना रेखाकला परीक्षेचे वाढीव गुण मिळण्यास लाभ होणार आहे . 
पैसा फंड इंग्लिश स्कूलचा कला विभाग कला विषयक विविध उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतो . १९९७ पासून प्रशालेचा रेखाकला परीक्षेचा निकाल सलग १०० टक्के लागत आला आहे . निकालाची १०० टक्क्यांची परंपरा विद्यार्थ्यांनी यावर्षी देखील कायम राखली आहे . रेखाकला परीक्षेसाठी प्रशालेत स्वतंत्र जादा तास घेतले जातात , तसेच तज्ञ मार्गदर्शकांच्या प्रात्यक्षिकांचेही आयोजन केले जाते . यासर्वाचा विद्यार्थ्यांना विशेष लाभ होतो . अ श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये आमकर राज दीपक , बाणे मांगल्य मंगेश , जाधव आदित्य अनिल , जाधव रेणूका किशोर , जाधव समृध्दी संतोष , पड्ये श्रृतिका संतोष , शिंदे तन्वी , प्रवीण , ताडे नाजिश समीर , तर कुचेकर स्वराज सागर याला ब श्रेणी प्राप्त झाली आहे . यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी अभिनंदन केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.