Ultimate magazine theme for WordPress.

पैसा फंडची ‘हर घर तिरंगा’ मोहिमे अंतर्गत परिसरात प्रभात फेरी

0 46

मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे

संगमेश्वर : आपला देश यंदा ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करत.या अनुषंगाने शासनाकडून आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जात आहे . प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असल्याने याच पार्श्वभूमीवर व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या वतीने संगमेश्वर परिसरातून आज प्रभातफेरी काढण्यात आली .

यावेळी ढोलाच्या गजरात आझादी का अमृत महोत्सवी वर्षा निमित्त घोषणा देण्यात आल्या. तसेच घोषवाक्यांचे विविध प्रकारचे फलकही तयार करण्यात आले होते. यावेळी संस्था सचिव धनंजय शेट्ये शाळेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे , शिक्षक नवनाथ खोचरे , किशोर नलावडे आदी शिक्षक वर्ग , शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरी मध्ये सहभाग घेतला. पैसा फंड इंग्लिश स्कूल, रामपेठ , बाजारपेठ मार्गे संगमेश्वर बसस्थानक अशा मार्गावरुन ही प्रभातफेरी मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. तत्पूर्वी शुक्रवारी केंद्रशाळा संगमेश्वर येथे संपन्न झालेल्या चित्रकला , घोषवाक्य , निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धेत पैसा फंड इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यांनी यामध्ये उज्वल यश देखील संपादित केले आहे. यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.