https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

पैसा फंड इंग्लिश स्कूलचा निकाल ९६ टक्के

0 75

संगमेश्वर दि . १८ ( प्रतिनिधी ): संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल ९५ : ८६ टक्के लागला आहे . दहावीच्या परीक्षेला एकूण १२१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातील ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . प्रशालेने आपली उत्तम निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे .

कोवीड काळात शाळा बंद असतांना विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून प्रशालेने दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसह अन्य वर्गांसाठी जादा तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला . याबरोबरच उजळणी आणि सराव परीक्षा यावर भर दिल्याने बारावीच्या तीनही शाखांचा निकाल १०० टक्के लागला होता . यापाठोपाठ आता दहावीचा निकालही ९५ : ८६ टक्के लागला असल्याने यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत .

प्रशालेतून १२१ विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक दिप्ती हितेंद्र पटेल ( ९१ : २६ ) , द्वितीय क्रमांक रिया जगदीश पाटील ( ८६ : ६० ) , तृतीय क्रमांक मांगल्य मंगेश बाणे ( ८५ : ६० ) चतुर्थ क्रमांक नाजिश समीर ताडे ( ८४ : ०० ) , पाचवा क्रमांक स्वराज सागर कुचेकर ( ८३ : ८० ) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे . प्रशालेने उज्वल निकालाची आपली परंपरा यावर्षी देखील कायम राखल्याने पालकवर्गाने देखील समाधान व्यक्त केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.