उरण दि 10(विठ्ठल ममताबादे ) : दि. 10/08/2022 रोजी 11.35 ते 12.40 वा दरम्यान”स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अनुषंगाने उरण पोलीस ठाणे हद्दीतील सिटीजन हायस्कूल आणि जूनियर कॉलेज, बाजारपेठ, उरण येथे उपस्थित विद्यार्थी यांना पोलीस प्रशासनातर्फे सायबर गुन्हे, महिला वरील लैंगिक अत्याचाराबाबत व अमली पदार्थामुळे होणारे दुष्परिणाम, याबाबतचे प्रबोधन करून जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच विद्यार्थी यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणे बाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील ,उपनिरीक्षक वैशाली गायकवाड, उपनिरीक्षक गुरव, मुख्याध्यापिका श्रीमती सरवद पेंडकर, सहसचिव अखलाक शिलोत्री, सचिव इस्माईल मुकरी, यांच्यासह मुले/मुली असे 125 विद्यार्थी उपस्थित होते.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |