उरण (विठ्ठल ममताबादे ): भेंडखळ येथे कै. रोहिदास महादेव घरत यांच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ प्रकल्पग्रस्त संघटना भेंडखळ मार्फत प्राथमिक शाळा भेंडखळ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.कै.रोहिदास घरत यांच्या कामगार व सामाजिक क्षेत्रातील कामांचा यावेळेस गुणगौरव सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात केला.त्यांच्या पश्चात त्यांचं सामाजिक व प्रकल्पग्रस्तांसाठीच कार्य पुढे नेणार असल्याच यावेळी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष अनिल अशोक ठाकूर यांनी सांगितले.यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले पालवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परशुराम भोईर,चंद्रविलास घरत,सामाजिक कार्यकर्ते नासिकेत म्हात्रे यांनी कै.रोहिदास घरत यांच्या सामाजिक व कामगार क्षेत्रातील कार्याबद्दल विस्तृतपणे आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात कै.रोहिदास घरत यांच्या पत्नी श्रीमती हर्षदा घरत व त्यांच्या दोन्ही मुली यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर,विकास सर,सर्व शिक्षक वर्ग,भेंडखळ गावचे माजी सरपंच मनोज भगत,माजी उपसरपंच मिलिंद पाटील,योगेश भगत, प्रकल्पग्रस्त संघटनेतर्फ अनिल ठाकूर,लिलेश्वर भगत,निलेश पाटील,शक्ती पाटील,अक्षय भोईर,संदिप म्हात्रे,रूण्मय म्हात्रे,प्रशांत पाटील,किरण घरत ,सचिन पाटील तर सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील,कविश ठाकूर,अमेश ठाकूर,प्रांजल भोईर,संतोष पाटील,दर्शन पाटील,ओंकार पाटील,अदित्य पाटील,स्वप्नील घरत,उमेश ठाकूर,महेश भोईर,अशोक ठाकूर व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.