शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार
उरण (विठ्ठल ममताबादे ) : कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर रविवार दि. 1 मे 2022 रोजी शिवसेनेचे द्रोणागिरीचे उपशहर प्रमुख प्रतीक पाटील यांच्या प्रतीक पाटील फॉउंडेशन नामफलकाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरणचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी प्रतीक पाटील फॉउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सांस्कृतिक कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपावी अशा शुभेच्छा दिल्या.
या वेळी शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेच्या नवनियुक्त पदाधिकारी शहरसंपर्कप्रमुख कल्पेश पाटील, द्रोणागिरी शहरसंघटक किसन म्हात्रे, उपजिल्हायुवती अधिकारी कु रविना ठाकूर, उपतालुका युवती अधिकारी कु. बेबी ठाकूर व उपतालुका युवती अधिकारी कु. अंकिता घरत, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेक्टर 51 चे उपशाखाप्रमुख आनंद कोपे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास उरण शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, युवासेना शहरप्रमुख करण पाटील, शहर सचिव धनंजय शिंदे, फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ भोईर, उद्योगपती नरसु पाटीलसर, कुणाल पाटील, द्रोणागिरी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष रवींद्र पाटील, शिक्षक नेते रमणिक म्हात्रे, बोकडविडा अध्यक्ष त्रिशूल ठाकूर, कार्याध्यक्ष विदित पाटील, सुरेखा भोईर, प्रतीक पाटील फॉउंडेशनचे हितेश घरत ,ओमकार कडू व कार्यकर्ते उपस्थित होते.