प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय यांचा शपथविधी
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, प्रा. राम शिंदे, उमाताई खापरे आणि प्रसाद लाड या विधान परिषदेच्या पाच नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी शुक्रवारी विधिमंडळात पार पडला.
या निमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भाजपा विधीमंडळ कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार विजय तथा भाई गिरकर उपस्थित होते.