मुंबई, ४ ऑगस्ट २०२२ : भाजपाचे प्रदेश चर्चा प्रतिनिधी (पॅनेलिस्ट ) प्रा. विनायक आंबेकर यांच्या, ‘किंगमेकर क्रॉनिकल-वसुली व घोटाळ्यांचे पर्व’ या पुस्तकाचे प्रकाशन भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खा. डॉ. किरीट सोमय्या यांच्या हस्ते व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी भाजपा प्रदेश कार्यालयात करण्यात आले. या पुस्तकात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या राज्यकर्त्यांच्या वसुलीकांडांवर तसेच अन्य घोटाळयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते असिफ भामला यावेळी उपस्थित होते.