पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य
रत्नागिरी : पर्यावरण दिन आणि 6 जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, सुभेदार मायनाक भंडारी स्मारक समिती, शिवप्रतिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली प्लास्टिकमुक्त गडकिल्ले मोहीम या धर्तीवर आधारित, प्लास्टिकमुक्त रत्नदुर्ग मोहिम राबवण्यात आली .
किल्ल्याच्या परिसरात असणारा प्लास्टिक कचरा, बाटल्या एकत्रित करण्यात आल्या. याहीवेळी रत्नदुर्ग किल्ल्यावरील परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.गडावर येणाऱ्या शिवप्रेमी व पर्यटकांनी या परिसरात कचरा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नगरपरिषदेमार्फत पर्यटक येणाऱ्या परिसरात कचराकुंडी ठेवली पाहिजे, जेणेकरून त्यात सर्व प्रकारचा कचरा गोळा करता येईल असे यावेळी सहभागी संस्थांच्या प्रतिनिधीनी सांगितले.