हुश्श! ठरलं बुवा एकदाचं..! पहिलीच्या १३ तर इतर शाळा १५ जूनला उघडणार!
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरु होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, १३ जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हे कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जून रोजी सुरू होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.