Ultimate magazine theme for WordPress.

फुंडे हायस्कूलमध्ये नागपंचमी निमित्ताने सर्प जागृतीपर कार्यक्रम

0 49

सर्पमित्र राजू मुंबईकर यांचे उदबोधक व्याख्यान

उरण दि 3 (विठ्ठल ममताबादे ) : श्रावण महिना म्हणजे मराठमोळ्या सणांची रेलचेल असते. त्यातील अगदी पहिला सण म्हणजे नागपंचमी! रयत शिक्षण संस्थेचे, तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे मंगळवार दि 2 ऑगस्ट रोजी नागपंचमी सण आनंदाने साजरा करण्यात आला.

इयत्ता नववी ब च्या वर्गाने या कार्यक्रमाची छान तयारी केली होती. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू ,प्राचार्या सुनिता वर्तक , पर्यवेक्षक गोडगे सर, म्हात्रे एस.जी आणि नववी ब च्या वर्गशिक्षिका म्हात्रे के.जी आणि शिक्षिका वृंदच्या हस्ते नागोबाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. नववी ब च्या विद्यार्थिनींनी नागपंचमी सणाचे महत्व आपल्या भाषणातून विशद केले.

   यानंतर नागपंचमी कार्यक्रमानिमित्त विद्यालयात केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष,महाराष्ट्र भूषण, सर्पमित्र राजू मुंबईकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सर्पमित्र राजू मुंबईकर यांनी सर्पविज्ञान, सापबद्दल समज आणि गैरसमज, अंधश्रद्धा याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली. विषारी आणि बिन विषारी सापांची फ्लेक्स फोटोद्वारे ओळख करून दिली.तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत खऱ्या अर्थाने त्यांना सर्पविज्ञान समजावून सांगितले.याप्रसंगी त्यांचे सहकारी कुणाल वास्कर, साजन वास्कर, वनविभाग अधिकारी एस बी इंगोले, आर.एस. पवार, डी. एन. दिविलकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख एच.एन.पाटील यांनी केले होते.तसेच या दिवशी सोनारी गावच्या सरपंच पूनम कडू यांचेकडून विद्यालयास वृक्ष रोपे आणि फुलझाडे भेट म्हणून देण्यात आली.
   यानंतर नागपंचमी कार्यक्रमानिमित्त विद्यालयात केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष,महाराष्ट्र भूषण ,सर्पमित्र राजू मुंबईकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सर्पमित्र राजू मुंबईकर यांनी सर्पविज्ञान, सापबद्दल समज आणि गैरसमज, अंधश्रद्धा याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली. विषारी आणि बिन विषारी सापांची फ्लेक्स फोटोद्वारे ओळख करून दिली.तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत खऱ्या अर्थाने त्यांना सर्पविज्ञान समजावून सांगितले.याप्रसंगी त्यांचे सहकारी कुणाल वास्कर, साजन वास्कर, वनविभाग अधिकारी एस बी इंगोले, आर.एस. पवार , डी. एन. दिविलकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख एच.एन.पाटील यांनी केले होते.तसेच या दिवशी सोनारी गावच्या सरपंच पूनम कडू यांचेकडून विद्यालयास वृक्ष रोपे आणि फुलझाडे भेट म्हणून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.